कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटळ्याचे आरोप केलेले आहेत. यावरून आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरूच आहे. या आरोपांवरून सोमय्या यांनी मुश्रीफांविरोधात पोलिसांत तक्रारही दिली आहे. तर मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनूकसानीचा दावा दाखल केला आहे.
हे सर्व घडत असताना हसन मुश्रीफ यांच्यावर अजून एक गंभीर आरोप करण्यात आलाय. मात्र, यावेळेस सोमय्यांनी नव्हे तर ताराराणी आघाडीचे नेते आणि माजी महापौर सुनील कदम यांनी केला आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीच मदत केल्याचा आरोपही कदम यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. मुश्रीफ यांनी मंत्रिपद आणि कोल्हापूर मनपातील सत्तेचा गैरवापर करत मनपाच्यामालकीची आठ कोटी रुपये किमतीची पंधरा गुंठे जमीन बळकावली आहे. याशिवाय महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये कोट्यवधी रुपयांची इमारत बांधून घोटाळा केला आहे’, असा आरोप सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांनी केला.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क येथील पंधरा गुंठे जमीन हसन मुश्रीफ यांनी बळकावली आहे. यासाठी त्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांवर दबाब आणला. खोटी कागदपत्रे तयार केली. महापालिकेतील काही फायली गायब केल्या. महापालिकेची जागा असतानाही खोट्या कागदपत्रांच्या आधारे ही जागा घेत मुश्रीफ यांनी ती त्यांच्या मुलाच्या म्हणजे साजिद मुश्रीफ यांच्या नावावर केली आहे. या जागेला बंदिस्त करत त्यांनी ती ताब्यात घेतली आहे.’
‘खरे तर ही जागा महापालिकेने ड्रिमवर्ल्ड वॉटर पार्कला भाड्याने दिली होती. ज्ञानशांती कंपनीने मुश्रीफांना त्याचा परस्पर ताबा दिला आहे. ही कंपनी डॉ. संजय डी. पाटील व पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची आहे. त्यांच्या मूकसंमतीमुळेच मुश्रीफांनी महापालिकेची जागा बळकावली आहे’, असा आरोप कदम बंधूंनी केला. मुश्रीफांच्या या घोटळ्याविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटे बोल पण रेटून बोल’ देवेंद्र फडणवीसांच्या लातूर दौऱ्यावर काँग्रेसची टीका
- युपी सरकारच्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज- संजय राऊत
- शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणाऱ्यांना फासावर लटकवा; सदाभाऊ खोत यांची मागणी
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- ‘शिवसेना भाजपबरोबर ठरलेले लग्न मोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पळून गेली अन्..’


