Share

‘बाप लेकीची मिठी जी चिरंतन राहील’; विलासरावांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाची भावुक पोस्ट

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आज ७६ व्या जयंतीनिमित्त त्यांची सून अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने खास फोटो शेअर केला आहे. तसेच या दिवशी रितेश देशमुख याने देखील एक भावुक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना या दोघांनीही सोशल मिडियद्वारे उजाळा दिला आहे.

जेनेलियाने ट्वीट करत एक फोटो शेअर करत लिहिले की,’वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही तुमची आठवण काढतो. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील’ असं कॅप्शन देत जेनेलियांना विलासरावांना मारलेल्या मिठीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश-जेनेलियाच्या लग्नातील आहे. जेनेलियाच्या फोटोवर अनेक जणांनी विलासरावांच्या आठवणी जागवल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वडिलांच्या जागी असलेले सासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

 

तर दुसरीकडे  रितेशने देखील एक पोस्ट शेअर केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांच्या आठवणीना उजाळा दिल आहे. यावेळी रितेशनेही लहानपणीचा फोटो शेअर करत ‘देवा, घड्याळाचे काटे कृपया पुन्हा उलटे फिरव. तुमची दररोज आठवण येते पप्पा’ असं कॅप्शन दिलं आहे.

 

मागील वर्षी विलासराव देशमुख यांच्या ७५  व्या जयंतीनिमित्त रितेशने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला होता. ‘अभी मुझमे कही बाकी है थोडीसी जिंदगी’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर रितेशने एक व्हिडिओ शूट केला होता. तर रितेश आणि विलासरावांचा एक पाठमोरा फोटोही यामध्ये होता. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना तुमची नेहमी आठवण येते, असं लिहिलं होतं. यावेळी देखील त्याने एक लहानपणीचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा आठवणी जागवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!