Share

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना धक्का, ED ने टाकली निकटवर्तीयाच्या घरावर धाड

Published On: 

नागपूर : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मंगळवारी आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालयाने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या तीन निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकून झडती सुरू केली आहे. शिवाजी नगरातील सागर भटेवरा, सदर येथील सुमित आयझॅक यांच्यासह जाफर नगरातही आणखी एका ठिकाणी इडीच्या टीमकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

पहिली कारवाई शिवाजीनगर परिसरात हरे कृष्णा अपार्टमेंटमध्ये करण्यात आली. हरे कृष्ण अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर सागर भटेवारा या व्यावसायिकाच्या सदनिकेत ईडीचे तीन अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले. साडे सातला आलेले ईडीचे अधिकारी सव्वा अकराच्या सुमारास परतले

दुसरी कारवाई न्यु कॉलोनी परिसरात समित आयजॅक्स यांच्या घरात करण्यात आली. इथे ही ईडीचे तीन अधिकारी सकाळी साडे सातपासून दुपार पर्यंत कारवाई करत होते. आयजॅक्स यांच्या प्रशस्त बंगल्याच्या पहिल्या माळ्यावर ही कारवाई सुरू होती.

तिसरी कारवाई जाफरनगर भागात कादरी बंधूंच्या ठिकाणी झाली. कादरी बंधू कॉन्स्ट्रकशन लाईनमध्ये आहेत. इथे ही ईडीकडून कारवाई बद्दल कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. ज्या तीन जणांच्या ठिकाणांवर ईडी कडून कारवाई करण्यात आली. ते तिघे ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोठे चिरंजीव सलील देशमुख यांचे मित्र आहेत.

दरम्यान, सीबीआयने अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणी तपास गेला होता. त्या तपासात मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच काळा पैसा परदेशात पाठवणे यासारख्या काही गोष्टी समोर आल्या होत्या, याची माहिती सीबीआयने ED ला दिली होती. याच माहितीचा अभ्यास करून प्राथमिक तपास करून ED ने अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून लवकरच देशमुख यांना या प्रकरणी चौकशी करता बोलवण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!