नवी दिल्ली : गेल्यावर्षी १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेत जगाचा निरोप घेतला होता. या प्रकरणाला काही दिवसांनी एक वर्ष पूर्ण होईल. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्यात येत आहे. पण सुशांतचे वडील के.के.सिंह यांनी आपल्या मुलावर बनवण्यात येणाऱ्या बायोपिकवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आता सुनावणी सुरू असून कोर्टाने संबधित निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक चर्चांना उधान आले होते. सुशांतची हत्या झाल्याचा दावा काहींनी केला. त्यामुळे प्रकरण खूप दिवस रंगले. कुटुंबीय, चाहते आणि बिहार सरकारच्या सततच्या मागणीनंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या हातून काढून घेत सीबीआयकडे देण्यात आले. सीबीआयनंतर ईडी आणि एनसीबी देखील या प्रकरणात सामील झाले. एनसीबीचा तपास मात्र अद्याप सुरू आहे. कालांतराने सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
पण यानंतर काही निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्याच्यावर बायोपिक तयार करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट निर्माते विजय शेखर यांनी देखील चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर देखील प्रसिद्ध केले. सुशांतचा बायोपिक चित्रपट प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले होते. पण सुशांतच्या वडिलांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यानूसार कोर्टाने विजय शेखर यांना नोटीस बजावत उत्तर मागवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जवळचा की दूरचा? ‘तन्मय’ प्रकरणी राष्ट्रवादीने काढली देवेंद्र फडणवीसांची वंशवेल
- योगी सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा, हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
- नागपूरसाठी १० हजार रेमडेसिवीर पाठवा, हायकोर्टाचे ठाकरे सरकारला आदेश
- कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
