Share

‘बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत’ ; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई : ठाकरे सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यामुळे खुद्द शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मनसे प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ” वरळी मतदारसंघातले शेकडो शिवसैनिक दुसऱ्या पक्षात गेले. बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री, मतदारसंघात 2 माजी आमदार तरीही मोठ्या प्रमाणात लोक शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मुंबईच्या वरळी मतदार संघात सामान्य लोकं स्थानिक आमदाराच्या नावाने शिव्या घालत आहेत.” असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.

“लोकप्रतिनिधी कसा असावा, तर लोकातला असावा. वरळी मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत निवडून दिलं होतं, पण काही महिन्यातच इथल्या मतदारांना त्यांच्या कामाची प्रचिती आली. सध्या कोणतीही निवडणूक नाही. परंतु राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा या नागरिकांनी व्यक्त करत मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे” असे मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!