🕒 1 min read
लातूर: यावर्षी उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा विक्रमी झाला आहे. सध्या मराठवाड्यात सोयाबीन बहरात आहे. यामुळे वेगळा प्रयोग तर यशस्वी झाला आहे. व घरच्या घरी शेतकर्यांना बियाणांची सोय झाली होणार आहे. शेतकऱ्यांची भविष्यातली चिंता मिटली आहे. उन्हाळी सोयाबीन जोमात असल्याने आता खरीपातील बियाणाची चिंता मिटली आहे.
बियाणाच्याबाबतीत शेतकऱ्यांची धावपळ तर होणारच नाही पण विकतच्या बियाणातून होणारी फसवणूकही टळणार आहे. पण घरगुती बियाणे वापरण्यापूर्वी ते प्रमाणित आहे का नाही याची शहनिशा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. यंदाचे पोषक वातावरण आणि कृषी विभागाने केलेली जनजागृती शेतकऱ्यांच्या कामी आलेली आहे. मात्र, यंदा महाबीजनेही मोठ्या प्रमाणात बियाणांसाठी सोयाबीनची लागवड केली आहे. त्यामुळे आता या सोयाबीनची विक्री होणार की नाही याबाबत साशंका उपस्थित होत आहे.
बियाणांचा प्रश्न मिटणार –
सोयाबीन आणि हरभरा यावर भर शेतकऱ्यांनी दिला आहे. पोषक वातावरण, मुबलक पाणी असतानाही खरीप हंगामाप्रमाणे सोयाबीनला उतारा पडत नाही. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची काढणी झाली असून एकरी 4 ते 5 क्विंटल एवढे उत्पादन होत आहे. घरच्या घरी बियाणांची सोय होणार आहे. हा वातावरणाचा परिणाम आहे. ज्या शेतकऱ्यांनी भोदावर लागवड केली आहे त्यांना अधिकचे उत्पादन झाले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
