Share

वाढीव रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना अक्रियाशील घोषित करुन नये, आ. पवार यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

लातूर : मराठवाड्यातील शेतकरी कायमच दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या छायेत जगत आहे. अशा परिस्थितीत त्याला पीककर्ज आणि पिक विमा यांचा आधारा आहे. लातूर मधील शेतकऱ्यांनसंदर्भात वाढीव रक्कम न भरलेला एकही शेतकरी अक्रियाशील होणार नाही, या संबंधी घोषणा करावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी दिपीप देशमुख यांचो भेट घेतली.

आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, ‘श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकंबी, एकंबीवाडी व एकंबीतांडा ही गावे समाविष्ट करावीत, सभासदांना शेअर्स पूर्ततेसाठी जिल्हा बँकेमार्फत वाढीव पीककर्ज मंजूर करावे किंवा वाढीव रक्कम न भरल्याने एकही शेतकरी अक्रियाशील होणार नाही असे घोषित करावे तसेच खरोसा येथे जिल्हा बँकेची शाखा सुरु करण्यात यावी अशी विनंती केली. माझ्या तिन्हीही मागण्यांबाबत तांत्रिक माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्याविषयी दिलीपराव देशमुख यांनी आश्वासित केले आहे.’

या मागण्यांसाठीचे एक निवेदनही आमदार पवार यांनी देशमुख यांना दिले आहे. या संबंधीची माहिती आमदार पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर दोघांमध्ये चर्चा झाली. या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!