अविनाश जाधव, शिरेगाव : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रोड वरील तुवर वस्ती जवळील ओढ्यात एक युवक वाहून जात असताना त्याला गावातील तरुणांमुळे जीवनदान मिळाले आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील रहिवासी असलेल्या आण्णासाहेब ज्ञानदेव नेहुल यांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले!
नेहुल हे करजगाव येथील आपल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी गावातील ओढा ओसंडून वाहत असल्याने रस्त्यावर पाणी आले होते. त्यांनी आपल्या पत्नीस गाडीवरून गाडी पाण्यात घातली. पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहासोबत वाहत गेले. यावेळी पाण्यात अडलेल्या झाडीस ते अडकले गेले.
जीव वाचवण्यास ते प्रयत्न करत असताना त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील तुवर वस्तीमधील काही तरुण पळत आले. त्यांना ही घटना लक्षात येताच तात्काळ दोरखंड मागवला. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे हा दोरखंड त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. अनेक प्रयत्नांनंतर हा दोरखंड त्या तरुणांपर्यंत पोहोचला व त्याने दोरखंड पकडल्यानंतर गावातील युवकांनी त्यांना बाहेर ओढून काढले.
अर्धातास चाललेल्या या थरारक घटनेमुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. युवकांनी दाखवलेली तत्परता व केलेली मदत या मुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे ,वाचलेल्या युवकाने व त्याच्या पत्नीने या तरुणांचे आभार मानले या वेळी ते दोघे भावनिक झाले होते .
गणेश जाधव, भरत तुवर , सुधाकर तुवर , धनराज तुवर , भानुदास माकोणे , शरद माकोणे , सीताराम जाधव , रमेश तुवर , संग्राम माकोणे , अजिंक्य तुवर, सोमजी जाधव, बायाजी जाधव, पांडुरंग जाधव तसेच परिसरातील या तरुणांनी युवकास वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सीताराम काशिनाथ जाधव यांनी संबंधितांना करजगावला पोहच केले.
त्या युवकाची बजाज मोटर सी टी हँडरेड सायकल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे अद्याप पर्यंत सापडलेली नाही. दरम्यान, तरुणास वाचवल्याबद्दल कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांनी वरील सर्व युवकांचे अभिनंदन केले.
महत्वाच्या बातम्या :
- ‘धनगर आरक्षण न मिळाल्यास तर महाविकास आघाडीला सळो कि पळो करू’, ओबीसी नेते प्रकाश शेडगे आक्रमक
- ‘विरोधकांनी किसानद्रोही असल्याचं सिद्ध केलंय’ ; भाजपच्या अवधूत वाघांचा टोला
- ‘सरकारला शेतकऱ्याचं म्हणणं ऐकावं लागेल, माघार घ्यावी लागेल’; २५ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलनाचा अजित नवलेंनी दिला इशारा
- काँग्रेसचा राज्यसभेतील गोंधळ म्हणजे निव्वळ तमाशा : अतुल भातखळकर
- द्रोह करणाऱ्या त्या पोलिसांची नावे जाहीर करा, अटक करा – प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

