🕒 1 min read
लातूर: गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आले. निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते. सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे, मात्र अजून म्हणावा तेवढा पाऊस जिल्ह्यात झाला नाहीये त्यामुळे अजून तरी पेरणी करू नये, असे आवाहन येथील कृषि विभागाने दिले आहे.
कृषि विभागाकडून असे आवाहन करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील सर्व कृषि बांधवांना कळविण्यात येते की, जिल्ह्यामध्ये शुक्रवारी दि. १० जून रोजी अखेर ५५.२ मीमी सरासरी पाऊस झालेला असुन अद्यापही पेरणी योग्य पाऊस पडलेला नाही. कृषि विद्यापिठाने किमान ८० ते १०० मीमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये अशी शिफारस केलेली आहे. ८०-१०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते.
तसेच शेतकऱ्यांना किमान आणखी २ मोठे पाऊस झाल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. कारण जेवढा पाऊस सध्या झाला आहे त्यामुळे पिकांसाठी तसेच पेरणीसाठी लागणारा ओलावा आणखी तयार नाही झालेला. त्यामुळे अनेकवेळा कमी ओळव्यावर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते, त्यामुळे ८०-१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते’
- श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश खेळाडूची भावनिक पोस्ट
- ‘सीएसकेचा सदस्य होणे ही सकारात्मक बाब’, श्रीलंका दौऱ्यावर निवड झालेल्या ‘या’ खेळाडुने मांडले मत
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
