Share

२० नोव्हेंबरला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देणार :शेट्टी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: दिल्लीत समांतर संसद भरवून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यात मांडून त्यातील ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले तसेच येत्या २० नोव्हेंबरला दिल्ली येथे १० लाख शेतकऱ्यांची ताकद दाखवून देणार असल्याचा इशारा देखील शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली देशातील १८० शेतकरी संघटना एकत्र येत असून, २० नोव्हेंबरच्या राष्ट्रव्यापी शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. कराड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा.शेट्टी सरकारवर चांगलेच बरसले. कर्जमाफीची प्रमाणपत्रे देण्याची घाई कशासाठी? प्रमाणपत्रावर किती कर्जमाफी झाली याचा उल्लेख आहे का? याचे फार्म भरण्याची वेबसाइट ओपन होत होती का? अटी आणि शर्ती पाहिल्या तर सरकारला खरोखरच कर्जमाफी द्यायची आहे का? असे प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केले.

योजना सरकारला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती द्यायचीच नसून कर्जमुक्तीच्या अन्यायी अटी व निकष, तांत्रिक अडचणी पाहता सध्या शेतकऱ्याच्या भावनेची चेष्टाच चालू आहे. पण, कर्जमाफी देता म्हणजे शेतकऱ्यावर उपकार करीत नसल्याचे शेट्टी यांनी राज्य सरकारला निक्षून सांगितले. शासनाच्या अन्यायी धोरणामुळे शेतमालाचे दर पडले आहेत. शेतकरी अडचणी व संघर्षांतून वाटचाल करीत आहे. तरी, संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि पुन्हा कर्जबाजारीपणा नको म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जावा ही आमची मागणी आहे. खरेतर, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेती व शेतकरी अडचणीत असल्याने आम्ही येत्या २० नोव्हेंबरला दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रीट येथे १० लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य परिषद घेऊन ताकद दाखवून देणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व १८० शेतकरी संघटना एकत्र येऊन या परिषदेत एकजुटीच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर कदापि गप्प बसणार नसून, देशातील शेतकरी एक करून न्याय हक्कासाठी खडा संघर्ष करून आमचे अधिकार, आम्हाला न्याय मिळवूच असा इशारा शेट्टी यांनी या वेळी दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!