Share

पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची फरफट, बँकांचा मनमानी कारभार!

Published On: 

वैजापूर : वैजापुर तालुक्यातील शिऊर येथील शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी बँकेत अनेक वेळा आपली शेतामधील कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. सकाळपासून बँकेत रांगा लावूनही कामे होत नसल्याने शेतकरी राजा हैराण झाला आहे. सध्या पेरणीची कामे सुरु आहेत. त्यातच पावसाच्या उघडीपमुळे चिंतातूर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. आणि या सर्वांमध्ये पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पीक कर्जासाठी भरलेल्या अर्जात त्रुटी काढून तो अर्ज बाहेर काढला जात आहे. काही शेतकर्‍यांना १५ दिवसांपासून चकरा मारूनही पीक कर्जासाठी नंबर लागत नाही. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आपली हातातील शेताची कामे सोडून बँकेत फरफट करावी लागत आहे. त्यातही बँक व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्‍यांना काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी थेट वैजापुर गाठावे लागत आहे. तर पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी बँकेत यावे लागत आहे.

त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पीक कर्जासाठी विलंब होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तत्काळ पीक कर्ज देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिऊर शाखेमध्ये ग्राहकांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिल्या जात आहे. या बँक शाखेतील व्यवस्थाक ग्राहकांबरोबर सौजन्याने कधीच बोलताना दिसत नाहीत. नेहमी अरेरावीची भाषा वापरतात. तसेच साध्या-साध्या गोष्टींसाठी ग्राहकांना विनाकारण हेलपाटे घालावे लागत असल्याचेही दिसून आले आहे. ग्राहकांना नियमांप्रमाणे माहिती दिली जात नाही. बँकेत योग्य ते फलक लावलेले नाहीत. यामुळे शेतकर्‍यांसह ग्राहक वैतागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!