औरंगाबाद : कोरोनामुळे आता जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उपचार घेणार्या सर्व रुग्णांना आवश्यक तेवढे इंजेक्शन मिळणे गरजेचे आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात इंजेक्शन उपलबध होणार असल्याने संबंधित शासकीय संकेतस्थळावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती नियमितपणे अपडेट ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी रात्री उशीरापर्यंत म्युकरमायकोसिस बाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, रुग्णांची माहिती संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत होणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारावरच शासनाकडून आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा होणार असल्याने ही माहिती अद्ययावत करण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ महापालिकेला उपलब्ध करुन देण्यात येईल.
शासनाकडून नियमितपणे इंजेक्शन प्राप्त होण्यासाठी संबंधित यंत्रणेच्या संपर्कात राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले. बैठकीच्या सुरूवातीला डॉ. नीता पाडळकर आणि डॉ. उल्हास गंडाळ यांनी म्युकरमायकोसिस आजाराबाबतची सद्यस्थिती जिल्हाधिकार्यांसमोर मांडली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारी घेणार असल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- हे दिवसही निघून जातील! काळजी घ्या, संयम बाळगा मनोविकारतज्ज्ञांचे आवाहन
- हे दिवसही निघून जातील! काळजी घ्या, संयम बाळगा मनोविकारतज्ज्ञांचे आवाहन
- सायबर पोलिसांनी सिल्लोड पोलिसांच्या मदतीने रोखला बालविवाह
- सोलापुरातील शेतकऱ्यांसमोर सरकारने टेकले गुडघे, उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द
- ‘कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

