Share

Eknath Shinde : सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनाही मिळणार ५० हजारांचे अनुदान, पुढील कॅबिनेटमध्ये निर्णय

Published On: 

Eknath Shinde | मुंबई : आज शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनतर दुसरी मोठी घोषणा म्हणजे आता नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे.

तर यानंतर पुढे कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50 हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र यातून कोल्हापूर सातारा सांगलीमधील शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. मात्र आता या शेतकऱ्यांचा देखील अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार आहे. पुढील कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार आहे. यासोबतच कोरोना प्रतीबांधक लस म्हणून राज्यातील १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे सर्वांना कोरोना प्रतीबंधक लस मिळावी हा हेतू साकार होईल. सध्या राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आकडा कमी असून बुस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!