Share

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी धीर सोडू नये- मुख्यमंत्री

Published On: 

मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती उद्भवली आहे. जवळपास २५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून नुकताच घेतला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे असून सर्वोतपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आणि आज मराठवाड्यातील सर्व पालकमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांना विविध सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. सध्या सुरु असलेल्या बचाव कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ करावेत, सततच्या पावसाने अनेक फळबागांचेही नुकसान झज्ञले आहे, शेतातील पिके वाहून गेली आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठवाड्यात एनडीआरएफचे जवान अतिशय चांगले कार्य करत आहेत. त्यांनी १०० जनांना वाचविले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जवानांचे कौतुक केले. एनडीआरएफचे एक पथक उस्मानाबाद आणि एक पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचे हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यात बचाव कार्य करत आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यासह विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, जळगाव, बुलडाणा आदी जिल्ह्यांतील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षोसाठी केंद्रावर पोहचू शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये, या विद्यार्थ्यांना पुन्हा सीईटी परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!