Share

पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो; बाळासाहेब थोरातांची भाजपवर जहरी टीका!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांना वेगवेगळ्या राज्यांतून विरोध होत आहे. पंजाब, राजस्थानसारख्या राज्यांनी केंद्राच्या कायद्यांना डावलून नवे कृषी कायदे लागू केले आहेत. ह्या सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो.

भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे. त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येत आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. काँग्रेसने कृषी कायद्यांच्या विरोधात सांगलीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी ना.थोरात बोलत होते.

ना.थोरात पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणासह देशभरातील अनेक राज्य पेटून उठले आहे. तिथे आजही आंदोलन सुरु आहेत. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना या कायद्यांचा चिमटा बसला नाही. मात्र धोका कायम आहे. ह्या सरकारने सध्याच्या घडीला शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली.

कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा आहे. दुधाची भुकटीही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरीही मोदी सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेत आहे. याचा अर्थ मोदी सरकारला शेतकऱ्यांची जिरवायची आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारला कृषी विषयक कायदे करण्याचा अधिकार नाही. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्याच पक्षाच्या लोकांचा सल्ला घेत नाहीत. त्यांचे दोन-चार अधिकारी आणि स्वत: मोदी असे एवढे मिळूनच ते निर्णय घेतात, असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीकेचे आसूड ओढले.

तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करुन राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. पण कितीही प्रयत्न केला तरी काँग्रेस संपणार नाही असे चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!