पुणे : राज्यात सध्या विरोधकांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवायांचा धडाका सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर आता ईडीने निशाणा साधला आहे. त्यावरुनच रोहित पवारांच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला काही लपवायची गरज नाही, असंही सुळे यांनी सांगितलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा काय म्हणता, ‘एक पार्टी एक देश’ पण आमचं त्यांच्याबरोबर विरोधात मत आहे. आमचा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार, चालणार पक्ष आहे. त्यामुळे एक देश आणि अनेक पक्ष राहिलेच पाहिजे, असंही सुळे यांनी भाजपला ठणकावून सांगितलं. रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. माझे रोहित यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांना अद्याप नोटीस आलेली नाही. पण आमच्यापैकी कोणालाही नोटीस आली तर आमची नेहमी सहकार्याची भूमिका राहिलेली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवायची काही गरज नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Momin Saqib | “भाई तेरा छक्का नही भूलूंगा…” ; पाकिस्तानी चाहता मोमीन साकिब याचं हार्दिक पांड्या साठी ट्विट
- Jayant Patil | मागील पिढीचा आदर केला पाहिजे – जयंत पाटील
- Girish Mahajan | जिंकणं हे आता शिवसेनेचं स्वप्नच बनून राहणार- गिरीष महाजन
- Amol Mitkari | मोहित कंबोज यांच्यावर अमोल मिटकरींचा हल्लाबोल! म्हणाले, “महाराष्ट्रमध्ये दूरवर …”
- Chandrakant Khaire | शिंदे गटातील आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, ते आमदार परत येणार- चंद्रकांत खैरे


