लातूर: आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळं शेतकरी बेहाल झाले आहेत तर ४ हजार कोटींपेक्षा अधिकच नफा कमावून विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत, असे वक्तव्य आमदार अभिमन्यू पवार यांनी एका पत्रकार परिषदेत केले आहे. एकट्या लातूर विभागात विमा कंपन्यांनी १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला असून सरकार मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अंतर्गत कुरघोड्यांमध्ये व्यस्त असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री तथा भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांनी लातूर येथे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला तसेच पत्रकार परिषद घेऊन पीकविमा व शेतकऱ्यांशी निगडित इतर विषयांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. २०१९ च्या तुलनेत २०२० साली सोयाबीन व इतर खरीप पिकांच्या उत्पादनात ५०% पेक्षा अधिकची घट झालेली आहे. २०१९ साली शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला होता पण २०२० साली मात्र जवळपास ९०% पात्र शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत, असे मत यावेळी बोंडे यांनी व्यक्त केले.
यावेळ आ. अभिमन्यू पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच टीका केली आहे, जनादेश प्राप्त केलेल्या सरकारला जनमताची आदरयुक्त भीती असते पण जनतेवर लादलेल्या या आघाडी सरकारला ना शेतकऱ्यांची चिंता आहे ना या सरकारचा विमा कंपन्यांवर वचक आहे. आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळं शेतकरी बेहाल झाले आहेत तर ४ हजार कोटींपेक्षा अधिकच नफा कमावून विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. एकट्या लातूर विभागात विमा कंपन्यांनी १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला असून सरकार मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अंतर्गत कुरघोड्यांमध्ये व्यस्त आहेत, अशी टीका पवार यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार : अकाली दलाने सोडलेले मंत्रिपद महाराष्ट्रातील महिला खासदाराला मिळणार?
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
