Share

#शेतकरी आंदोलन : दिल्ली पोलिसांकडून दीप सिद्धूसह फरार आरोपींवर ५० हजार ते १ लाखांचं बक्षीस !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी टॅक्टर मोर्चा काढून निषेध केला. मात्र, यावेळी आंदोलक आक्रमक झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी उग्र आंदोलन केलं. यामध्ये हिंसाचार बरोबरच तिरंग्याचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आंदोलनातील हिंसाचार नंतर हरियाणातील शेतकरी नेते गुरणाम सिंह आणि योगेंद्र यादव यांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यावर आंदोलनामध्ये हिंसाचार घडल्याचा आरोप केला आहे. दीप सिद्धू हा एक पंजाबी अभिनेता असून मात्र यावर स्पष्टीकरण देताना दीप सिद्धूने सांगितले की, ‘आम्ही लोकशाही मार्गाने आमचा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवला मात्र आम्ही यावेळी तिरंग्याला हटवले नाही.’ असे त्याने म्हटले. तर २०१९ मध्ये जेव्हा अभिनेते सनी देओल हे लोकसभा निवडणूक लढवत होते त्यावेळी त्यांच्या प्रचार मोहिमांमध्ये दीप सिद्धूचा देखील समावेश होता.

या आरोपींचा शोध घेण्यासाठी अभिनेता दीप सिद्धू, जुगराज सिंगसह इतर दोन आरोपी वर पोलिसांनी प्रत्येकी एक-एक लाखांचं बक्षीस तर तर जजबीर सिंग, बुटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांच्यावर प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे.

सध्या या घटनेचा तापास दिल्ली पोलिसांकडून सुरु आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली असून ज्वॉइंट कमिशनर बी. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची टीम तपास करणार आहे. या टीममध्ये तीन डीसीपींचा समावेश करण्यात आला आहे. यात जॉय टिर्की, भीष्म सिंह आणि मोनिका भारद्वाज यांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!