Share

व्हिडिओकॉनच्या कामगारांना मुख्यमंत्री ठाकरेंचे आश्वासन, लवकरच तोडगा काढणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : व्हिडिओकॉन कामगारांच्या थकीत पगाराच्या मागण्यांसाठी गेल्या 528 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणार्थीची व्यथा ऐकत लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. ५) भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला दिले. अनेक दिवसांपासून उपोषणकर्ते मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी करत होते. तब्बल ५२८ दिवसांनी हा योग जुळून आला. व्हिडियोकॉन ग्रुप एमप्लाईज युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. या कामगारांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात एका शिष्टमंडळाने शुक्रवारी मु्ख्यमंत्री यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची मागणी केली होती.

शिष्टमंडळाने व्हिडियोकॉन कंपनीचा आटो कार्स हा वाहतूक विभाग सुरु असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सदर कामगारांचे निवेदन स्विकारत यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात कामगार नेते कॉ. एड अभय टाकसाळ, गजानन खंदारे, विकास गायकवाड, किरणराज पंडित, बाळू पवार,अप्पासाहेब वैद्य यांचा सहभाग होता.

या नंतर उपोषण स्थळी झालेल्या बैठकीत आता अजून पंधरा दिवसांचा वेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राजकुमार धूत यांना देण्याचा निणNय झाला. त्यांतरही थकीत पगार न मिळाल्यास व्हिडिओकॉन कामगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राजकुमार धूत यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगार राज्यमंत्री बच्चु कडु यांनीही या आंदोलनाची दखल घेऊन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश ऑगस्ट २०२० मध्ये दिले होते, परंतु कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी अजुनही त्या आदेशाचे पालन केले नसल्याची माहिती अभय टाकसाळ यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!