मुंबई : शेतकरी वर्गाने बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या अनेक महागड्या भाज्यांची शेती करण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते. यामधील काही भाज्या तब्बल १२०० ते १३०० रुपयांपर्यंत विकल्या जातात. ज्यामधून शेतकऱ्यांचा चांगला फायदा होऊ शकतो. पण या महागड्या भाज्या कोणत्या? पाहूया..
१) शतावरी –
ही शतावरीची भाजी भारतातील सर्वात महागड्या भाज्यांपैकी एक आहे. ती बाजारामध्ये सुमारे १२०० ते १५०० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. या भाजीच्या सेवनामुळे अनेक रोगांपासून बचाव केला जाऊ शकतो.
२) चेरी टोमॅटो –
ही भाजी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. तज्ज्ञांकडून नेहमीच चेरी टोमॅटोचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. बाजारामध्ये या टोमॅटोची किंमत ही सामान्य टोमॅटोंपेक्षा अधिक असते. सध्या हे टोमॅटो बाजारामध्ये सुमारे २५० ते ३५० रुपयांना विकले जातात.
३)जुकिनी –
या भाजीचे सेवन सामान्यपणे वजन घटवण्यासाठी केले जाते. जुकिनी ही आरोग्य आणि चवीच्या दृष्टीने खूप चांगली मानली जाते. बाजारामध्ये या भाजीची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी ही भाजी फायदेशीर ठरू शकते.
४)बोक चॉय –
या भाजीची शेती भारतामध्ये खूप कमी प्रमाणात होते. बोक चॉय ही एक विदेशी भाजी आहे. आता हळूहळू भारतातही शेतकऱ्यांनी या भाजीची शेती सुरू केली आहे. बाजारामध्ये या भाजीचा एक चक्क गड्डा ११५ रुपयांना विकला जातो.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

