Share

‘तेव्हा विराट म्हटला गलत इंसान से बात कर रहे हो भाई’; दिनेश कार्तिकने सांगितला मजेशीर किस्सा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलमध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने त्यांच्या संघात अनुभवी भारतीय यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकचा मेगा ऑक्शनमध्ये समावेश केला आहे. यापूर्वी, कार्तिक २०१५ मध्ये बेंगळुरू फ्रँचायझीचा भाग होता. मूळचा दक्षिण भारतातील असलेल्या कार्तिकने अलीकडेच बंगळुरूला परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच त्याने इंग्लंडमध्ये विराट कोहलीसोबत संभाषणात घडलेला एक मजेदार किस्साही शेअर केला आहे.

कार्तिकने (dinesh kartik) भारताच्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीसोबत (virat kohli) आरसीबीबद्दल केलेल्या संभाषणाची आठवण करून दिली. जिथे त्याने विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये संघात त्याला घेण्याची विनंती केली होती. “हो, मी विराटशी याबद्दल बोललो होतो पण, विराट म्हणाला गलत इंसान से बात कर रहे हो भाई (तू चुकीच्या व्यक्तीशी बोलत आहेस, भाऊ)!”

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर २७ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएल २०२२ मध्ये त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. गेल्या आठवड्यात, आरसीबीने २०२२ च्या आवृत्तीच्या सुरुवातीपूर्वी फाफ डू प्लेसिसची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!