नागपुरात : भाजपाच्या वतीने चार राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाचे नागपुरात सेलिब्रेशन करण्यात आले. याठिकाणी गोव्याच्या आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणारे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.
भाषण करताना नितीन गडकरी यांनी फडणवीसांचं भरभरून कौतुक केले. म्हणाले, दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या काळातही मिळालं नाही इतके यश फडणवीसांनी मिळविले. यासह नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला. म्हणाले, “गोव्यात अनेक पक्ष उतरले होते. भाजपाला अपशकून देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रात मुलाखत देऊन भाजपाचा पराभव कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. पण गोव्याच्या जनेतेमध्ये त्यांचं काय स्थान आहे हे समोर आलं. यानिमित्ताने हीदेखील एक चांगली गोष्ट घडली”. असे भाषणादरम्यान नितीन गडकरी म्हणाले.
तसेच यासह “महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही” असे दमदार वक्तव्य नितीन राऊत यांनी केले आहे. “गोव्यात महाराष्ट्रातील कार्यकर्ते भेटले. फडणवीसांच्या नेतृत्वात काम केलेल्या या सर्वांचं मी अभिनंदन करतो. हा विजय आता थांबवणार नाही. ही विजयाची पताका “एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही” असा मला विश्वास आहे,” असे गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

