Share

रंग खेळताना त्वचेची ‘अशी’ काळजी घ्या!

Published On: 

मुंबई : रंगपचमीचा सण म्हणजे विविध रंगाची उधळण कऱणारा सण. हा सण फक्त एका दिवसावर सण येऊन ठेपलाय. या सणाच्या तयारीला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. सण साजरा तर करायचा, परंतु विविध रंगाने त्वचेवर परिणाम होतो त्याचे काय? अशावेळी त्वचेची काळजी कशी घ्यावी? याविषयी माहिती घेऊया..

ज्यांची त्वचा खूप सेन्सेटिव्ह असते अशांना त्वचेची अ‍ॅलर्जी, खाज, त्वचेला भेगा पडणं यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे धुलीवंदन या सणाला रंगांची उधळण करताना त्वचा, कान आणि डोळ्यांकडे विशेष लक्ष द्या.

अशी घ्या त्वचेची काळजी –

१) खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल किंवा वॅसलिन त्वचेला लावून रंग खेळा. यामुळे शरीराला लागलेले रंग लवकर धुवून निघण्यास मदत होते. रंग खेळताना संपूर्ण शरीर झाकले जाईल असेच कपडे घाला.
२) धुळवड खेळून घरी परतल्यावर भरपूर पाणी प्या. त्यामुळे रंग खेळताना चुकून तोंडात गेलेल्या रासायनिक पदार्थांची बाधा शरीराला होणार नाही
३) होळी खेळून झाल्यावर लगेच पाणी वापरू नका. सुक्या हातांनी किंवा कपड्याने रंग साफ करा.
४) रंग साफ करताना त्वचा घासू नका. साबणाऐवजी शक्यतो फेसवॉश वापरा
५) जर रंगामुळे त्वचेवर परिणाम झाल्याचे जाणवल्यास संबंधित त्वचेचा भाग थंड पाण्याने धुवून काढा.
६) चेहऱ्यावरचा रंग काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. व रंग काढतानाही डोळे आणि ओठ बंद ठेवा.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!