Share

व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून सोनपेठमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

परभणी : कर्जफेडीसाठी धमक्या आणि आर्थिक विवंचनेतून सोनपेठमधील तरुण शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. मंगळवारी दुपारी चंद्रकांत ऊर्फ मुंजाजी भगवान धोंडगे यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.

सोनपेठ तालुक्याच्या तिवठाणा गावातील तरुण शेतकरी चंद्रकांत धोंडगे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये लिहिले होते की, “मी शेतात आहे, उद्या सकाळी माझी माती आहे. सगळ्यांनी यावे. मला पैशांसाठी धमक्या येत आहेत. म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करा, पैश्यामुळे मला त्रास झाला.” असे लिहिलेल्या कागदांचे फोटो त्यांनी आपल्या स्टेटसवर ठेवले होते.

या प्रकाराची माहिती चंद्रकांत यांचे चुलते हनुमान धोंडगे यांना मिळाल्यावर त्यांनी ताबडतोब शेतात धाव घेतली. विष प्राशनाने अत्यवस्थ झालेल्या चंद्रकांत यांना त्यांनी लगेच गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृत शेतकरी धोंडगे यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षांचा मुलगा, दोन वर्षांची मुलगी, एक भाऊ, एक विवाहित बहीण असे कुटुंब आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!