नवी दिल्ली : निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. रोजगार निर्मिती, मंदी या सगळ्याचं सावट देशावर आहे. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन विरोधक सातत्याने निशाणा साधत आहेत. ही सगळी आव्हानं पेलत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करीत आहेत.
अन्नदाता उर्जादाता बनवण्यावर आम्ही भर देणार आहोत. जलसंकटात असलेल्या 100 जिल्ह्यांना अर्थसहाय्य देणार आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. शेत जमिनींचा वापर चांगल्या पद्धतीने करुन अधिक उत्पन्न कसं घेता येईल यावर आमचा भर असणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,किसान रेल योजना सुरू करून दूध, मांस, मासे वाहतूक करणे सुसह्य करणार अशी घोषणाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.वस्तू आणि सेवा कराची (GST) सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केली. अर्थसंकल्पी भाषणादरम्यान त्यांनी वस्तू आणि सेवा कराची माहिती दिली.
‘जीएसटी’ने मागील दोन वर्ष आव्हानांचाही सामना केला, पण बदल करण्यासाठी जीएसटी परिषदेने काम केलं. आतापर्यंत आपल्याला नवीन १६ लाख करदाते मिळाले असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. २०१७ मध्ये देशात जीएसटी लागू झाला होता. त्यातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न जीएसटी कौन्सिलकडून केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
मत्स्यपालनाचा विस्तार करण्यासाठी 500 मत्स्य उत्पादक संस्था तयार करणार, ग्रामीण भागातील युवकांना सागर मित्रांप्रमाणे सक्षम केले जाईल. सेंद्रिय शेतीवर भर, 2025 पर्यंत दुग्ध उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. जलजीवन मिशनसाठी 3.6 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर आता विमानातून जाणार कृषी सामान, नाशवंत मालासाठी कृषी उडाण योजना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गावर योजना सुरु करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

