Share

ओटीटी प्लॅटफॉर्मवर फरहान अख्तरच्या ‘तूफान’ चित्रपटाने रचला नवा विक्रम

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या ‘तुफान’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटावर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान तसेच बॉलीवूडचे अनेक कलाकारांनी या सिनेमाचा रिव्ह्यू दिला. हा चित्रपट संपूर्ण भारतभर प्रचंड गाजला. अनेकांनी फरहानने निभावलेल्या भूमिकेचे भरभरून  कौतुक केले.

यातच आता अभिनेता फरहान अख्तरच्या ‘तूफान’ च्या या चित्रपटाने अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर नवा विक्रम केला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ‘तूफान’च्या रिलीजनंतरच्या पहिल्या एक आठवड्यात सगळ्यात जास्त पाहिला गेलेला हा सिनेमा ठरला आहे. तर जगभरातील १६० हून अधिक देशांमध्ये आणि प्रांतातील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आहे.

फरहान अख्तरने या चित्रपटात मुंबईतील डोंगरी भागातील स्थानीक गुंडा अज्जु भाईचे पात्र साकारले आहे. त्याच्या आयुष्यात अनन्याचे प्रेम येताच त्याचे आयुष्य बदलुन जाते. ती त्याला बॉक्सिंग चॅम्पियन बनण्यासाठी ती त्याला तयार करते. गुंडा ते बॉक्सर असा फरहान अख्तरचा हा प्रवास या चित्रपटाद्वारे सादर केला जाणार आहे. अज्जू भाईचा एक निर्णय़ त्याला बॉक्सिंगच्या वर्तुळात आणून सोडतो.

तर फरहानच्या प्रेयसीच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेत अभिनेते परेश रावल हे आहेत. तर इतर कलाकारामध्ये सुप्रिया पाठक शाह, हुसैन दलाल यांचा समावेश आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित तूफान या चित्रपटामध्ये अभिनेता फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!