मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ ने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिका लोकांना खळखळून हसण्यास भाग पाडले. यातील सर्वच कलाकरांनी आपल्या अंदाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे. अनेक दिग्गज कलाकर या शोमध्ये हजेरी लावतात. अक्षयकुमार, रणवीर सिंग, शाहरुख खान, आमिर खान असे अनेक कलाकार या शोमध्ये उपस्थितीत राहिले आहे. यंदाच्या भागात फराह खान यांनी हजेरी लावली आहे.
‘झी कॉमेडी फॅक्टरी’ या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंधा मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश या कलाकारांनी या मंचावर आल्या आहेत. यामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर फराह खान आल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘मला ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये येऊन खूप आनंद झाला आणि भरपूर मजा आली. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही. मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं आणि हा त्यांचा गुणधर्म आहे असं मला वाटतं.’ असं म्हणून मंचावरील सर्व विनोदी कलाकरांचे फराह खान यांनी कौतुक केल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- पुण्यातील भिडे पुलात जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

