Share

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कंगणावर फराह खान संतापली तुझी हिम्मत कशी झाली….

Published On: 

मुंबई: कंगणा आणि शिवसेनेमधील युद्ध संपत असताना आता एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कंगणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी नावाने संबोधल्याने अभिनेत्री फराह खानने कंगणावर टीका केली आहे. कंगणाने ज्या पद्धतीने मागील काही काळात राजकीय भूमिका घेतल्या त्यावर बॉलिवूडमधील खूप कलाकार सहमत नाहीत.आता ते पुढे येऊन कंगणाचा विरोध करताना दिसत आहेत.मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. या कारवाईमुळे संतापलेली कंगना सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका करत आहे. महाराष्ट्र सरकार आणि कंगना यांच्यात सुरु असलेल्या या शाब्दिक द्वंद्वात आता अभिनेत्री फराह खान अली हिने उडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन तू तुझी योग्यता सिद्ध केलीस, असं म्हणत तिने कंगनावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात ठाकरे सरकारची दहशत वाढत चालली आहे अशी टीका अभिनेत्री कंगना रणौतने केली. आज एका निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. एका माणसावर सुमारे ८ ते १० लोकांनी हल्ला केला. त्यांची चूक इतकीच होती त्यांनी सरकारची निंदा केली. त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. ही बाब योग्य नाही असं म्हणत अभिनेत्री कंगना रणौतने ठाकरे सरकारवर टीका केली. कंगना रणौतने तिच्या फेसबुक पेजवरुन यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!