Share

श्रीरामपूरकरांचा जनता कर्फ्यूला उदंड प्रतिसाद

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- श्रीरामपूर शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व पक्षीयांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या जनता कर्फ्यूला आज रविवारी पहिल्याच दिवशी शहरवासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आज शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांवरील दुकाने कडकडीत बंद होती. शहर लॉकडाऊन करण्याच्या प्रश्नावर झालेल्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर आज रविवारी पहिल्या दिवशी शहरवासीयांचा प्रतिसाद मिळेल किंवा नाही याची साशंकता होती. मात्र शहरातील जनतेने या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा उदंड प्रतिसाद दिला.

श्रीरामपूरमधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन आठ दिवस शहर बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याला आजी-माजी आमदार वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी देखील साथ दिली आहे. त्यामुळे सर्व पक्षीयांच्या साथीने हा आठ दिवसांचा लॉकडाऊन यशस्वी होईल असे चित्र आज निर्माण झाले आहे. कोरोनचा आजार गरीब-श्रीमंत काही पाहत नाही. तो कोणालाही होऊ शकतो. शहरातील सर्व रुग्णालय सध्या फुल्ल आहेत. त्यामुळे आपल्या घरातील कोणालाही कोरोना होऊ नये ही काळजी शहरातील प्रत्येक नागरिक घेताना दिसून येत आहे.

श्रीरामपूर शहरामध्ये लॉकडाऊन वरून आजी-माजी आमदारांकडून जे हीन दर्जाचे राजकारण करण्यात आले आहे त्याबद्दल सामान्य जनतेने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा रोग शत्रुला सुद्धा होऊ नये अशी प्रत्येकाची भावना असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी आणि बैठकीला आम्हाला बोलावले नाही म्हणून त्याला जर कुणी विरोध करणार असेल तर ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!