Share

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी-रामदास आठवले

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रामध्ये पोलीसांवर दबाव आणून चुकीचे कलम लावले जात आहे. गुंडागर्दी करणं शिवसेनेची जुनी सवय आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.आठवलेंनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगणा रनौतची भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.आता त्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कंगणा रनौत मुंबईत आल्यानंतर रिपब्लिकन पक्ष तिला सुरक्षा देईल असही आठवले यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.मुंबईत आल्यानंतर आठवलेंनी कंगणाची भेट घेतली होती. शिवसेना आणि कंगणा यांच्यात मोठा वाद महाराष्ट्राने बघितला. त्यात आठवलेंनीही उडी घेतली होती. आता यावर महाविकास आघाडीतील नेते कशा पद्धतीने उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचे आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेने कंगणा रनौतचं कार्यालय तोडल्यानंतर आता आणखी एक नोटीस कंगणाला देण्यात आली आहे. तिच्या खारघरमधील घराचं बांधकाम अवैध असून त्यासाठीची नोटीस तिला महापालिकेने दिली आहे. आता यावरुन कंगणाला अजून एक धक्का बसणार का यावर चर्चा सुरू झाली आहे.कंगना हिनं फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 13 मार्च 2018 रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिनं फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.

तक्रार मिळाल्यानंतर 26 मार्च 2018 रोजी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या या फ्लॅट्सची पाहाणी केली होती. त्याच दिवशी कंगनाला BMC under 53/1 of MRTP act for unauthorized construction beyond plan नुसार नोटिस बजावण्यात आली होती. या नोटिशीला 27 मार्च 2014 रोजी बीएमसीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!