Share

ती दिवसातून सात आठ वेळा न सांगता गायब होते…कोण…वाचल्यास खळखळून हसाल तुम्ही

Published On: 

आर्वी : ती गेली की बाजूच्या घरात डोकावून बघितले जाते… त्यांच्या घरातून गेली तर समाधान आणि नसेल गेली तर मात्र कपाळावर आठ्या पडतात… मात्र, जरा चमकली तर चेहर्‍यावरील आनंदाला पारावार राहत नाही… तालुक्यातील नांदपूर येथे मात्र ती दिवसातून कमीत कमी सात आठ वेळा न सांगता गायब होते… बरं, ती जाते तर जाते तिच्यावर लक्ष ठेवणारे ती सावध असायला हवे नं! तर तेही म्हणातात मी बघतो… आता बघा या गावातल्या लोकांनी कोणाच्या तोंडाकडे बघावे… ती येण्याची वाट पाहत बसून असतात बिच्चारे थकलेले जीव! आता ती म्हणजे कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असून ती म्हणजे आपली वीज हो!

तालुक्यातील नांदपूर येथील महावितरणच्या वीज उपकेंद्रातून सर्कसपूर, टोणा, देऊरवाडा, निंबोली, कर्माबाद, ईठलापूर, अहिरवाडा, राजापुर, अंबिकापूर, नांदपूर, माटोडा, बेनोडा, एकलारा, धनोडी आदी गावांना वीज पुरवठा केला जातो. परंतु, या भागात कायमचेच दुरुस्ती व देखभालच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित होतोच. परंतु, दर एका तासातून कमीत कमी पाच ते सहा वेळा विद्युत पुरवठा अचानक चालू बंद होत असल्याने अनेकांच्याघरची विजेवरील उपकरणं निकामी झाली आहेत. याबाबत अभियंत्यांना भ्रमणध्वनी केला की चौकशी करतो एवढेच उत्तर मिळते!

गेल्या काही कालावधीत हा त्रास जरा जास्तच झाला आहे. वारंवार होणार्‍या बिघाडीची दुरूस्ती पुरता विचार करून हा बिघाड नेमका का झाला आणि भविष्यात हा बिघाड होऊ नये या दृष्टीने विचार केल्या जात नसल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. महावितरणमध्ये तज्ज्ञ असताना देखील याबाबत विचार विनिमय करून कायम स्वरूपी या बिघाडाचा बंदोबस्त केला जात नाही.

जेव्हा ग्राहक वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार करतात तेव्हा फक्त तांत्रिक बिघाडच्या नावावर वीज बंद असल्याचे सांगतात. वारंवार घडणार्‍या बिघाडावर आणि विजेच्या येण्याजाण्यामुळे खरच ‘तांत्रिक बिघाड’ झाला आहे की कामावर असताना कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे वीज गोल झाली याबाबत शंका निर्माण होते.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!