मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेद्वारे घरघरात पोहोचलेला आदित्य अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे. सोशल मीडीयाच्या द्वारे तो अनेकदा चाहत्यांच्या भेटीला येत असतो.
आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णी पुन्हा एकदा त्याच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये विराजसच्या हातात एक बंदुक आहे आणि त्याने घातलेला शर्ट रक्ताने माखलेला दिसत आहे. या व्हिडीओत विराजस बंदुकीत मॅगझीन लोड करत बंदुक लोड करताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी विराजसने बंदुक कॅमेराच्या दिशेने रोखुन धरली आहे. या व्हिडीओला ‘ऑडीशन फॉर गॅंगस्टर फिल्म’ असे कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/p/CQ3HWt6p-YU/
मालिकेत मितभाषी, निरागस अशी भूमिका असणाऱ्या विराजसच्या या व्हिडीओनंतर त्याच्या चाहत्यांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने ‘आदित्य विथ केचप’ अशी विनोदी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका चाहत्याने तु इतका गोड आहेस की गॅंगस्टर वाटत नाही. मालिकेत आदित्य आणि सईच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत. यातच जेडीच्या एन्ट्रीमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकार विरोधकांना घाबरले ?
- …तरीही शिखर धवनला संधी नाहीचं
- आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात; मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार
- रहाणेच्या अपयशावर बोट ठेवत संजय बांगरने सुचवले ‘हे’ पर्याय
- भारतीय संघाला दुय्यम म्हणणाऱ्या रणतुंगाला आकाश चोप्राने दिले सडेतोड उत्तर


