नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवाल, (Mayank Agarwal) अजिंक्य रहाणे, (Ajinkya Rahane) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी मंगळवारी सेंच्युरियन येथे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह बारबेक्यू नाईटचा आनंद लुटला. क्रिकेटपटूंसोबतच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर, संघाचे फिजिओ नितीन पटेल आणि इतर काही सपोर्ट स्टाफ सदस्यही या पार्टीत सहभागी झाले होते. एका लॉनमध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ ‘बारबेक्यू नाईट’चा आनंद घेत होते. अनेक क्रिकेटपटूंनी या बारबेक्यू नाईटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विराट कोहली दिसत नसताना चाहते टीम इंडियाच्या कसोटी कर्णधाराबद्दल विचारत आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी या ‘बारबेक्यू नाईट’चे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या संमिश्र कमेंट्स पाहायला मिळत आहेत, मात्र चाहते विराट कोहलीबद्दल विचारत आहेत.
विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर कसोटी कर्णधाराने स्फोटक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये विराट कोहलीने कर्णधारपदावरून हटवण्याबाबत काही गोष्टी सांगितल्या होत्या. तो म्हणाला होता की, त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्याच्या दीड तास आधी निवडकर्त्याचा फोन आला आणि त्याला याबाबत माहिती मिळाली.

याआधी सौरव गांगुलीने एक विधान जारी केले होते की विराट कोहलीला T20 चे कर्णधारपद सोडण्यास मनाई करण्यात आली होती, पण त्याने ते मान्य न केल्यामुळे निवडकर्त्यांनी निर्णय घेतला की मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी दोन कर्णधार असू शकत नाहीत. अशा परिस्थितीत विराटच्या जागी रोहित शर्माकडे मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोपवण्यात आले. पत्रकार परिषदेत विराटने गांगुलीचे वक्तव्य फेटाळून लावले आणि त्याच्यासोबत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआयमधील वाद चव्हाट्यावर आला. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहलीला ‘बारबेक्यू नाईट’मध्ये न पाहिल्यानंतर चाहत्यांनी पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
- रहाणे, अय्यर की विहारी पहिल्या कसोटी कोण खेळणार?
- तुकाराम सुपेच्या कार्यालयात आणखी सापडलं ३३ लाखांचं घबाड
- “राज्यासमोरील भीषण समस्यांवर उत्तरे शोधण्यात या सरकारला जराही रस नाही”
- “हे सरकार आपसात पायात पाय गुतून पडेल…”, रावसाहेब दानवेंचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकारण
- “लाखो युवकांच वाटोळं करायचा विक्रम ठाकरे-पवार सरकारच्या नावावर काळ्या कोळशाने लिहला जाईल”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

