🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंना दणका दिला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आता नुकतंच एका मराठी अभिनेत्याने ट्विट केले आहे. सध्या ते ट्विट खूप चर्चेत आहे.
मराठी अभिनेता आरोह वेलणकर कायम राजकीय विषयांवर त्याचे मत मांडत असतो. सध्या आरोह वेलणकरने एकनाथ शिंदे यांच्या ट्विटला रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यावर आरोह वेलणकरने रिट्विट करत ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असे ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहेत.
परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं. ???????? https://t.co/Y0xRK8xSdl
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 21, 2022
त्याचबरोबर आरोह वेलणकरने अजून एक ट्विट केले, “संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये झालेला गोंधळ आणि अनागोंदी पाहावी”, असे अभिनेत्याने ट्विटमध्ये म्हंटले आहे. . “अनेक मराठी वाहिन्यांवर एकनाथ शिंदेंसोबत १२ शिवसेना आमदार नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. नक्कीच काहीतरी मोठं घडणार”, हे देखील ट्विट आरोहने केले आहे. असे तिन ट्विट करत आरोहने स्वतःचे मत मांडले आहे. आरोहच्या ट्विटवर अनेक नेत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी त्याला ट्रोल करण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
The entire state and voters of #Maharashtra should watch the grand, confused and shameful chaos that is called- महाविकासआघाडी सरकार! ????????♂️
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 21, 2022
So Marathi news channels reporting 12 ShivSena MLA’s along with Eknath Shinde incognito. Looks like something big is coming…Good Morning.
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 21, 2022
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
