Share

चोरीच्या दुचाकीवर बनावट क्रमांक टाकणाचे सत्र सुरूच! आरोपींना पोलीस कोठडी

Published On: 

औरंंगाबाद : दुचाकी चोरल्यानंतर त्यावर बनावट क्रमांक टाकून फिरणा-या गणेश प्रल्हाद बमनावत (वय २६, रा. वांजोळा, के-हळा ता.सिल्लोड) याला सोमवारी नाकाबंदी करणा-या पोलिसांनी गजाआड केले. अटकेत असलेल्या गणेश बमनावत याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यायचे आदेश प्रथम वर्ग न्या यदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी मंगळवारी (दि.१८) दिले.

नुतन कॉलनीत राहणारा श्रेयस नरेंद्र जैस्वाल (वय २०) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एब्ल्यू-३४५१) चोरट्यने २४ नोव्हेंबर २०१५ रोजी भोईवाडा परिसरातील लाल बावटा ट्रेड युनियन सेंटर च्या कार्यालयासमोरून चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याला बराच कालावधी उलटल्याने गुन्ह्यात अ फायनल समरी मंजूर करुन गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आला होता.

दरम्यान, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी १७ मे रोजी गजानन महाराज मंदीर चौकात नाकाबंदी करीत होते. त्यावेळी पोलिसांनी गणेश बमनावत याला थांबवून दुचाकीच्या कागदपत्राविषयी चौकशी केली. त्यावेळी बमनावत हा उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी ई-चलन मशिनवर दुचाकीचा चेसीस नंबर टाकून तपासला असता सदरील दुचाकी श्रेयस जैस्वाल यांची असल्याचे समोर आले, तसेच दुचाकी चोरीचा गुन्हा क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती मिळाली. पुंडलिकनगर पोलिसांनी गणेश बमनावत याला ताब्यात घेत क्रांतीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!