औरंंगाबाद : भाजीपाला विक्रेत्याचा मोबाइल चोरुन पळ काढण्याचा प्रयत्न करणा-या शेख शफिक शेख अजीस (वय ३०, रा. गल्ली नं. ५, बायजीपुरा) याला नागरिकांनी पाठलाग करुन चांगलाच चोप दिल्याची घटना मंगळवारी (दि.१८) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जाधववाडी भाजीमंडी येथे घडली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शेख शफिक याला हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी दिले.
हर्सुल परिसरातील मारुती नगरात राहणारे कचरु साहेबराव निकम (वय ३५) हे किरकोळ भाजीपाल्याची विक्री करुन आपल्या कुटूंबाचा उदनिर्वाह करतात. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या् सुमारास ते भाजी पाला घेण्यासाठी जाधवमंडीत गेले होते. भाजीपाला खरेदी केल्यानंतर ते भाजीपाला विक्रीसाठी किरकोळ भाजीमंडीत गेले.
भाजीपाला विक्री करित असतांना पहाटे साडेपाच वाजेच्याा सुमारास शेख शफिक हा निकम यांच्याजवळ आला व त्याांचा मोबाइल चोरुन धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. ही बाब निकम यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा करीत चोरट्याचा पाठलाग करुन इतर नागरिकांच्या मदतीने त्याला पकडून चांगलाच चोप देत सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी शेख शफिक याच्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृत्युदर कायम
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

