Share

बनावट डिझेल प्रकरण; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे एकच खळबळ!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर शहरांमध्ये बनावट डिझेलचा टँकर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पकडण्यात आला होता. या कारवाईला आता पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

नगर जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ रॅकेटचा योग्य दिशेने तपास करून मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी काल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. राजकीय मंत्र्याच्या दबाव असल्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाती लागत नसल्याचा आरोप कर्डीले यांनी केला आहे. त्यामुळे आता पोलीस कारवाईत हस्तक्षेप करणारा ‘तो’ मंत्री कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना कर्डिले म्हणाले की, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस नगर शहरांमध्ये बनावट डिझेलचा टँकर पकडण्यात आला होता. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. राजकीय वरदहस्त असल्याने खुलेआम बनावट डिझेल विक्री केली जात आहे.

केवळ राजकीय दबावापोटी कारवाईस विलंब होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राजकीय दबावाला बळी न पडता बनावट डिझेल व नाफ्ता भेसळीचा योग्य व निपक्ष तपास करून मुख्य सूत्रधार व इतर सह आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी कर्डिले यांनी केली आहे.

फटाके बंदीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘फटाके व्यवसायिकांनी लाखो रुपये खर्च करून माल भरला आहे. त्यामुळे आता फटाके बंदचा निर्णय घेतला तर छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक यांच्यावर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. मुळात दिवाळी हा सण फटाके वाजल्यावरच आल्याचे कळते, असे कर्डीले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!