मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातील कणकण व इतर काही लक्षणे दिसल्यामुळे त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवून कोरोना चाचणी देखील करून घेतली होती. मात्र, पहिली चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची आणखी एक चाचणी करण्यात आली, त्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
यानंतर त्यांना, मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, 2 नोव्हेंबर रोजी अजित पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी आठवडाभर घरातच विश्रांती घेतली. आता ते पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाटसऍपद्वारे सांगितलं होतं.
आता, अजित पवारांनी कामासाठी पुनरागमन केल्यानंतर सुळेंनी फेसबुक लाईव्ह करत अजित पवार पुन्हा जोमाने कामास लागल्याचं दाखवलं आहे. यात अजित पवार काही फाईलींवर सह्या करताना दिसले. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी आपल्या खुर्चीपासून बरंच अंतर ठेवलं असल्याचं लाईव्हमध्ये दिसत आहे. या लाईव्हमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, दत्तात्रय भरणे गप्पा मारताना दिसत आहेत.
कोरोनाकाळात देखील पवारांच्या कामाचा धडाका!
कोरोना काळात देखील अगदी भल्या पहाटेपासून पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनी ठिकठिकाणी धडक देत कामाची पाहणी केली होती. त्यामुळे स्पष्ट वक्त असलेल्या अजित पवारांना धडाकेबाज निर्णय घेणारा नेता म्हणून ओळखलं जातं याचं प्रचिती येत होती. याकाळात त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊनच ते भेट घेत असल्याचं दिसून आलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याने कोरोनाला केलं चीतपट !
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्राची पाहणी करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
- वारकऱ्यांचा कार्तिकी वारी करण्याचा निर्धार, मायबाप पांडुरंगासमोर केलं भजन आंदोलन
- कमाल झाली ! अर्णब गोस्वामीच्या सुटकेसाठी राम कदमांच्या पायी वाऱ्या सुरूच…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
