अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी मुस्लीम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द वापरून व्यंगचित्र काढले होते. तर त्यांच्या विरोधात संपूर्ण देशात मोर्चे आंदोलने काढण्यात आली होती. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रो यांच्या विरोधात काल अहमदनगरमध्ये मुस्लीम कमेटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात फ्रान्स राष्ट्रपतींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली. दरम्यान परवानगी न घेता आंदोलन केल्याने पोलिसांनी मुस्लीम कमेटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी मुस्लीम समाजाचे मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द वापरून व्यंगचित्र काढले होते. त्याचाच निषेध म्हणून काल अहमदनगर मुस्लीम कमेटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मुस्लीम कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली.
तसेच त्यांच्या फोटोवर चिखल फासण्यात आले. तसेच बूट आणि चप्पल देखील फेकून मारण्यात आली. दरम्यान, मोहम्मद पैगंबरांच्या कार्टून वादामुळे फ्रान्समध्ये एका दहशतवाद्याने चर्चमध्ये घुसून शिक्षकेचा गळा चिरून तिची हत्या केली होती. या सारख्याच आणखी एका हत्येचा प्रकार समोर आल्याने फ्रान्समध्ये खळबळ माजली होती. फ्रान्सच्या एका चर्चमध्ये हल्लेखोराने एका महिलेचा गळा चाकूने चिरला होता. तसेच अन्य दोन लोकांवर चाकूने वार करून हत्या केली होती. ही घटना फ्रान्सच्या नाईस शहरात झाली होती.
यावेळी बोलताना मुस्लीम कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनीं सांगितले की, ‘मोहम्मद पैगंबर संपूर्ण विश्वामध्ये शांतीचे प्रतिक आहेत. असं असताना फ्रान्सच्या राष्ट्रपतीनीं त्यांच्यासंदर्भात केलेंले वक्तव्य हे कदापि सहन होणारे नसून आम्ही इस्लाम धर्म जोपर्यंत भीतीमुक्त होतं नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू.’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. दरम्यान विनापरवानगी निषेध आंदोलन केल्याने पोलिसांनी मुस्लीम कमेटीच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाला हरवल्यानंतर अजितदादांच्या कामाचा धडाका सुरु!
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- महात्मा गांधीप्रमाणे अर्णबला त्रास दिला जातोय : संबित पात्रा
- ‘आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवायला हवी होती’
- कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट!


