Share

कैद्यांचे बनावट जामीनपत्र कारागृहाच्या पेटीत

Published On: 

औरंंगाबाद : जामिनावर मुक्त होण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचे तीन बनावट जामीनपत्र तयार करुन कारागृहाच्या पेटीत टाकून शासनाची फसवणूक केलेल्या तीन कैद्यांविरुध्द हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उध्दव उर्फ उद्या मजल्या भोसले, आसाब दस्तगीर शेख आणि विशाल मिलिंद पारधे अशी तिघांची नावे आहेत.

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या उध्दव भोसले, आसाब शेख आणि विशाल पारधे यांच्याविरुध्द न्यायालयाने मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या तिघांनी संगणमत करुन न्यायालयाचे बनावट जामीनपत्र तयार केले. न्यायालयाने तिघांना जामीन दिल्याचे पत्र हर्सूल कारागृहातील पेटीत टाकण्यासाठी स्वत:जवळ बाळगत होते.

या प्रकाराविषयी तुरुंग प्रशासनास सुगावा लागला. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. इर्शाद याकुब सय्यद (वय ३५, रा. मुजफ्फरनगर) असे या अधिकाऱ्याचे नाव होते. त्यावरुन सोमवारी सायंकाळी तिघांविरुध्द हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास उपनिरीक्षक अतुल ठोकळ करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!