🕒 1 min read
अकोला : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलक कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना व आंदोलक कर्मचाऱ्यांना शुक्रवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान आज (सोमवार) न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्र एस टी कामगार सेना संघटनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोट पोलिसात सदावर्ते, त्यांची पत्नी आणि दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अकोट पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.
मागील पाच महिन्यापासून एसटी कर्मच्याऱ्यांचा संप सुरु आहे. या संपादरम्यान कर्मचारी पदाधिकारी हे वेगवेगळ्या लोकांमार्फत आर्थिक शोषण करुन संपकरी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
अजयकुमार गुजर हे एस टी महामंडळाच्या औरंगाबाद डेपो क्रमांक 01 मध्ये प्रमुख कारागीर या पदावर कार्यरत असून ते कनिष्ट वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेद्वारे एसटी महामंडळात बेकायदेशीर पध्दतीने संपाची नोटीस देवून, संपाला सुरवात झाली आणि संप काळात बऱ्याच कर्मचाऱ्यांची राज्य शासनात विलनीकरणाची इच्छा असल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी या संपात सहभागी झाले. त्यामुळे एस टी प्रशासनाने सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यास सुरवात केली होती. यातच संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित व बदली करण्याचे आदेश राज्य परिवहन प्रशासनाने काढले होते. त्यातून सुटका व्हावी व आपल्यावरील कार्यवाही रद्द व्हावी या करीता कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरु झाले होते.
कर्मचाऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन अजयकुमार बहादरसिंग गुजर आणि गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करुन प्रशासनाद्वारे होत असलेली कार्यवाही रद्द करुन देतो, अशा खोट्या भुलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 300/- तथा 500/- रुपये जमा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यभरातील जवळपास 70,000 एस टी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेली रक्कम 3 करोड रुपये असल्याचा अंदाज असून, याचे पुरावे तक्रारदार विजय मालोकार यांनी पोलिसांना दिले आहेत. तर काही रक्कम अजयकुमार गुजर यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आल्याचे पुरावे सुद्धा मालोकार यांनी पोलिसांना दिले असल्याचे कळते. अकोट पोलिसात याबाबत तक्रार दिली असल्याने ॲड. सदावर्ते यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 SRH vs GT : हार्दिकच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातचं हैदराबादला १६३ धावांचं आव्हान!
IPL 2022 : फ्लाईंग राहुल त्रिपाठी..! गुजरातच्या फलंदाजाला ‘पॉवरफुल’ कॅचनं धाडलं माघारी; पाहा VIDEO
“…तर भाजप ४०-५० पेक्षा जास्त जागांवर निवडून येणार नाही”- जयंत पाटील यांचं मोठं विधान
IPL 2022 : मैदानात घुसून रोहितला भेटायला आलेल्या ‘त्या’ फॅनचं पुढे काय झालं? तुम्हीसुद्धा करू नका अशी चूक!
“एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खतपाणी घालणाऱ्यांचा शोध घेणार”- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
