नवी दिल्ली: भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची (Lata Dinanath Mangeshkar Award) घोषणा करण्यात आली आहे. मंगेशकर कुटुंबातर्फे उषा मंगेशकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे.
२४ एप्रिल रोजी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यास पंतप्रधानांनी सहमती दर्शवल्याची माहिती देखील उषा मंगेशकर यांनी दिली आहे. नरेंद्र मोदी लतादीदींना बहीण मानायचे. नरेंद्र मोदी देशसेवा करत आहेत, जे काम करत आहेत ते पाहूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे उषा मंगेशकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान यावेळी ह्रदयनाथ मंगेशकर यांनी म्हटले की, प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांना देखील या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दीदींच्या नावाला शोभेल अशाच पुरस्कारार्थीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सोबतच यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी राहुल देशपांडे यांना तर सिनेमात आशा पारेख, जॅकी श्रॉफ यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच उत्कृष्ट सामाजिक सेवेचा पुरस्कार मुंबई डबेवाले संघटनेला देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 SRH vs GT : हैदराबादनं रोखला गुजरातचा विजयीरथ; हार्दिकसेनेचा पहिला पराभव!
सदावर्तेंना मोठा झटका! 3 कोटींचा घोटाळा?; अकोटात फसवणुकीचा गुन्हा दाखल
IPL 2022 SRH vs GT : हार्दिकच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातचं हैदराबादला १६३ धावांचं आव्हान!
IPL 2022 : फ्लाईंग राहुल त्रिपाठी..! गुजरातच्या फलंदाजाला ‘पॉवरफुल’ कॅचनं धाडलं माघारी; पाहा VIDEO
“…तर भाजप ४०-५० पेक्षा जास्त जागांवर निवडून येणार नाही”- जयंत पाटील यांचं मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

