मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहात १० एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा हिंसा झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मांसाहाराला विरोध करत विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघाने (JNUSU) केला आहे. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत जेएनयूएसयूमधील काही विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘विद्यापीठाच्या कावेरी वसतिगृहाच्या खाणावळीत रविवारी मांसाहारी जेवण तयार केले जाते. त्या मांसाहारी जेवणास हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या ‘अभाविप’ने विरोध केला. तो दिवस रामनवमीचा होता. त्यामुळे मांसाहार वर्ज्य असे या लोकांचे सांगणे आहे. काय खावे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असला तरी भाजपच्या नवहिंदुत्ववाद्यांनी ‘खाण्या’वरून याआधी देशभरात हिंसा घडवली आहे. भाजपचे लोक रोजगार, महागाईवर बोलत नाहीत. मांसाहारासारख्या विषयावरून ते बेरोजगारांचे लक्ष दुसरीकडे वळवीत आहेत. धर्म ही अफूचीच गोळी आहे, याचे प्रत्यंतर हिंदुस्थानात रोजच येत आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘जेएनयू’त हिंसा मांसाहारावरून झाली, पण भाजपवाले रामनामास बदनाम करीत आहेत. वादात रामाला ओढत आहेत. विद्यापीठातील डाव्यांनी म्हणे रामनवमीच्या पूजेस विरोध केल्याने वाद झाला. हे खोटे आहे, असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “भाजपचे हिंदुत्व मतलबी आणि तकलादू”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- IPL 2022 SRH vs GT : हार्दिकच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातचं हैदराबादला १६३ धावांचं आव्हान!
- IPL 2022 : फ्लाईंग राहुल त्रिपाठी..! गुजरातच्या फलंदाजाला ‘पॉवरफुल’ कॅचनं धाडलं माघारी; पाहा VIDEO
- “…तर भाजप ४०-५० पेक्षा जास्त जागांवर निवडून येणार नाही”- जयंत पाटील यांचं मोठं विधान
- IPL 2022 : मैदानात घुसून रोहितला भेटायला आलेल्या ‘त्या’ फॅनचं पुढे काय झालं? तुम्हीसुद्धा करू नका अशी चूक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

