🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
एकाबाजूला मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना हाताळण्याच्या उपाययोजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. असे असताना उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघडीतील नेत्यांनी त्यांच्यावर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे. आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी, फडणवीसांनी युपीसह अन्य भाजपशासित राज्यांमध्ये लक्ष घालावं, असा टोला लगावला आहे.
उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याचे आदित्यनाथ यांना पत्र@Dev_Fadnavis जींनी युपी व अन्य भाजपा शासित राज्यांमध्ये लक्ष घालावे. मविआ सरकार महाराष्ट्र सांभाळण्यासाठी समर्थ आहे, इथे फार त्रास घेण्याची आवश्यकता नाही https://t.co/IecGlP4C0H
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 9, 2021
‘उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याचे आदित्यनाथ यांना पत्र. त्यामुळे देवेंद्र फडणवीसजींनी युपी व अन्य भाजपा शासित राज्यांमध्ये लक्ष घालावे. मविआ सरकार महाराष्ट्र सांभाळण्यासाठी समर्थ आहे, इथे फार त्रास घेण्याची आवश्यकता नाही,’ असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती…’; गडकरींचा प्रेमळ सल्ला
- लोकांना भेटायला मी काय सरपंच आहे का ?, शिवसेना खासदाराचे बेताल वक्तव्य !
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- पंढरपूरचं मैदान मारल्यानंतर आवताडे, परिचारक फडणवीसांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
