Share

फडणवीसांनी चिथावणी देणाऱ्या सहकाऱ्यांना समजवावं; चव्हाणांचा इशारा

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. तर, भाजपच्या आरोपांवर आज अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे.

माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांना आवर घालावा, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे. ‘महाराष्ट्र सध्या शांत आहे. कोरोना रोग सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो कोणी सहकारी चिथावणी देत असतील त्या सहकाऱ्यांना सांगावं,’ असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

यासोबतच, ‘महाराष्ट्रात सत्तेसाठी तसेच राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ज्यांनी जो उद्योग सुरु केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने सहभागी होऊ नये. सर्वेच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पुढचे पाऊल उचलण्यासाठी आपण सज्ज आहोत. त्यामुळे कोरोनाची स्थिती असताना कृपया चिथावणी देण्याचे काम कोणीही करु नये,’ असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!