पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी शिवसेना-भाजपच्या काळात शिवसेनेला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. विक्रम गोखले हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सेना-भाजप युतीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता ते काय म्हणाले हे गोखलेंनी सांगितलं आहे.
शिवसेना-भाजपची युती झाली नाही. त्याबाबत मी देवेंद्र फडणीसांना विचारणा केली. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद का दिलं नाही? असा प्रश्न मी फडणवीसांना विचारला. त्यावर फडणवीसांनी चूक झाल्याचं सांगितलं, असा खळबळजनक दावा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला आहे. गोखले यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत.
शिवसेना-भाजपला एकत्रं आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. अडीच वर्ष शिवसेनेला दिले असेल तर काय बिघडलं असतं असा प्रश्न मी एकदा फडणवीसांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी? असा सवालही मी त्यांना केला होता. त्यावर चूक झाली असं फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा विक्रम गोखले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भातील एकमेव दुकानही बंद होईल- नाना पटोले
- ‘बिहार निवडणूका जवळ आल्या की, भाजपला महाराष्ट्र हे एकच राज्य बदनाम करण्यासाठी मिळतं
- खैरे, तुम्ही संसदेत हवे आहात; लोकसभेसाठी खैरेच उमेदवार, संजय राऊत यांचे संकेत!
- ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतातच’
- …अन्यथा उच्च न्यायालयात जाणार; कंगना विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

