Share

राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भातील एकमेव दुकानही बंद होईल- नाना पटोले

Published On: 

बुलढाणा : राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील धूसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सकाळी एका कार्यक्रमामध्ये ‘काँग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्र पक्षाने घेतली आहे’, असं वक्तव्य केलं होतं. मात्र मित्र पक्षापैकी नेमकं शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस हे नाना पटोलेंनी सांगितलं नव्हतं. त्यातच आता नाना पटोलेंनी राष्ट्रवादीबाबात केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये धूसफूस सुरु असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमेव दुकान बंद होईल. पंढरपूरची जागा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलडाण्यातील एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भात दुकान नाही, त्यामुळं ते बंद होईल, असं म्हणता येणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, आता नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील भूमिका काय असणार आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!