🕒 1 min read
मुंबई : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला. यावर मलिक यांनी आज फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा अनेक आरोप केले. त्यामध्ये, नोटाबंदीच्या काळात साडे १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्याचे प्रकरण फडणवीस यांनी दाबल्याचे मलिक यांनी दावा केला. आता, फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपाला एका वाक्यात उत्तर दिलंय.
Thought of the day ???????? pic.twitter.com/PkLiHS3GVW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2021
देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये एक सुविचार शेअर केलाय. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा हा सुविचार आहे. ‘आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबतची कुस्ती आपल्याला घाण करते आणि तेच डुकराला आवडतं’, असा आशय त्या सुविचारात आहे.
फडणवीस यांनी या ट्विटमध्ये कुणाचेही नाव घेतले नाही. पण मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी हे ट्विट केलंय. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटचा निशाणा स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे, अमृता फडणवीस यांनीही ट्विटद्वारे पुन्हा एकदा मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘बिघडलेल्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतली. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!,’ असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय
- १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबलं; मलिकांचा आरोप
- ४० एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतलेले बेशरम सरकार मोर्च्याला सामोरे जाईल का?
- एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, मात्र पोलिसांकडून अडवणूक
- ‘काल यांचे मंत्री दिसले नाही, एसटी कामगार विचारत होते’, नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

