🕒 1 min read
मुंबई : १९९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं. आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय. खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो. अशी जहरी टीका नितेश राणेंनी शिवसेनेवर केली आहे.
१८९३ साली हिंदू-मुसलमानांमध्ये दंगल झाली होती. या दंगलीचा दाखला देत नितेश राणेंनी ही टीका केली आहे. तत्कालिन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळात सध्या सत्तेत असलेल्या पक्षांवर कठोर टीका केली होती. आता त्यांचाच मुलगा उद्धव ठाकरे या पक्षातील नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे, असे नितेश राणे म्हणाले आहेत.
९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं…
आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय…
खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय.शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 10, 2021
सध्या एसटी कर्मचारी आंदोलन, मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत या मुद्द्यांवरुन विरोधी पक्षनेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. आता भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. यावर आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ४० एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतलेले बेशरम सरकार मोर्च्याला सामोरे जाईल का?
- एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, मात्र पोलिसांकडून अडवणूक
- ‘काल यांचे मंत्री दिसले नाही, एसटी कामगार विचारत होते’, नितेश राणेंचा टोला
- एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सदाभाऊ खोत यांचे अन्नत्याग आंदोलन
- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ‘या’ दिग्गज खेळाडूंना ठेवले संघाबाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
