मुंबई : महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर कामबंद आंदोलन करत आहेत. या मुद्द्यावरुन विरोधाक महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक प्रचारादरम्यानच्या भाषाणाचा व्हिडीओ भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. काल यांचे मंत्री दिसले नाही, एसटी कामगार विचारत होते, असा टोला नितेश राणेंणी लगावला आहे.
काल यांचे मंत्री दिसले नाही..
एस टी कामगार विचारत होते .. pic.twitter.com/7QH4WmAJfL— Nitesh Rane (@NiteshNRane) November 10, 2021
दरम्यान नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात, शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी सांगितलं होतं. शिवशाहीचं सरकार आल्यानंतर माझ्या राज्यामध्ये कोणालाही मोर्चा काढण्याची वेळ येता कामा नये, आणि जर कोणाचा मोर्चा आलाच तर तो ज्या मंत्र्यांच्या खात्यासंबंधीत असेल तो मंत्री मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन खाली येऊन त्या आंदोलकांना सामोरा गेला पाहिजे. बोला माता भगिणींनो काय माझं चुकलं मी काय करु तुमच्यासाठी, याला म्हणतात लोकशाही. असे उद्धव ठाकरे या व्हिडीओमध्ये बोलत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- झीलंडविरुद्ध टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा भूषविणार कर्णधारपद
- T20 WC: आज रंगणार उपांत्य फेरी; इंग्लंडपुढे न्यूझीलंडचे आव्हान
- रोहित-द्रविड जोडी टीम इंडियाला नव्या शिखरावर नेईल- रवी शास्त्री
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ‘या’ दिग्गज खेळाडूंना ठेवले संघाबाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

